The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २१ : “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या उदात्त भावनेतून संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट शाखा मालेवाडा यांच्या वतीने आज बुधवार दि.२० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ७१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. विशेष म्हणजे, यामध्ये ३ महिलांनी देखील रक्तदान करून सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवली.
शिबिराचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज किशन नागदेवे होते. प्रमुख अतिथी म्हणून मालेवाडाच्या सरपंच अनूसया सयाम, मंडळाचे क्षेत्रीय संचालक हरीष निरंकारी, कुरखेडा शाखा प्रमुख माधवदास निरंकारी, मालेवाडा पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नायकवाडी, उपसरपंच तुळशीराम बोगा, माजी जिल्हा परिषद सदस्य गीताताई कूमरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उंदिरवाडे, रक्त संकलन अधिकारी डॉ. ताराम, शाखा प्रमुख कृष्णाजी किंचक आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट मालेवाडा शाखेतील स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Malewada #KurKheda #Gadchiroli #SantNirankariMission #BloodDonationCamp #BloodDonation #SocialService #NirankariCharitableTrust #मालेवाडा #कूरखेडा #गडचिरोली #संतनिरंकारीमंडळ #रक्तदानशिबिर #रक्तदान #समाजकारण #निरंकारीचॅरिटेबलट्रस्ट

